विवाहितेचा छळ करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Foto
वैजापूर,  : शेती घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरुद्ध गुरुवारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बिलोणी येथील कोमल (२०) हीचे लग्न तालुक्यातील लाख खंडाळा येथील योगेश पुंजाराम गायकवाड याच्याशी २२ मार्च २०२६ रोजी झाले होते. लग्नानंतर शेती घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावेत असा तगादा सासरच्या मंडळींनी लावला. परंतु माहेरची परीस्थिती बेताची असल्याने ती पैसे देऊ शकली नाही. त्यामुळे तिचा छळ करण्यात आला. तसेच घराबाहेर हाकलून देण्यात आले. 

या प्रकरणी कोमल हिने दिलेल्या फिर्यादीवरून पती योगेश पुंजाराम गायकवाड, पुंजा चीराम कोंडाजी गायकवाड, आशाबाई पुंजाराम गायकवाड, अतुल पुंजाराम गायकवाड, मोनाली अतूल गायकुबाड सर्व रा लाखखंडाळा या पाच जणांविरुद्ध शिवूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार किशोर आघाडे हे करीत आहेत.